मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आज शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 10 मंत्री आणि 20 हून अधिक आमदारांना कोविडची लागण झाल्याची माहिती दिली.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 8,067 नवीन रुग्ण आढळले, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे 50 टक्के जास्त आहेत. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.