नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत असल्याचे दिसून येत आहे. आज सोन्यासोबत चांदीचे दर वाढले आहेत. या वाढीसह सोन्याचा भाव 48,000 च्या पुढे गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.
सोन्या-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या
फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.15 टक्क्यांनी वाढून 48,138 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी वाढला आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 62,444 रुपये आहे.
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.