मुंबई: हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीपीसीआर चाचणीत आठ पोलीस कर्मचारी आणि इतर दोघांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. दोघे जण हे विधानभवनातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या हिवाळी अधिवेशनावर आता करोनाचं सावट आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जवळपास तीन हजारांहून अधिक लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोनाबाधित दहा जणांमध्ये दोन जण हे विधानभवनातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.