जळगाव, (प्रतिनिधी)- श्री. राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रविणसिंग पाटील यांची निवड प्रदेशाध्यक्ष शामसिंग ठाकूर, प्रदेश कार्यध्यक्ष गुलाबसिंग ठाकूर यांनी केली असून याबाबतची माहिती महिला प्रदेशाध्यक्ष नंदाताई राजपूत यांनी दिली आहे.
प्रविणसिंग पाटील यांच्याकडे संघटनेची खान्देश विभागाची जबाबदारी होती.या काळात संघटनेला पूरक कामगिरी केल्याने व यशस्वीरित्या संघटनात्मक बांधणी करून विविध सामाजिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे, याचं कार्याची दखल घेत प्रविणसिंग पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.