मुंबई : गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून येतोय. आज गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोने 240 रुपयांनी घसरून 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट शुद्धतेचे सोने आज 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. याशिवाय, आज चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे . कालच्या तुलनेत आज चांदीचा भाव 600 रुपयांनी घसरून 60,900 रुपयांवर आला आहे.
विक्रमी किंमतीपेक्षा सुमारे 7490 रुपये स्वस्त
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 55,400 रुपये होती. आजच्या किमतीची सोन्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केल्यास, सोने त्याच्या विक्रमी किमतीपासून 7,490 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,680 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.