भुसावळ प्रतिनिधी | झाशी येथील रेल्वे स्थानकावर इंटरलॉकिंगच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० गाड्या रद्द, तर दोन गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
रद्द केलेल्या गाड्यांमध्ये १२५९७ गोरखपूर-मुंबई साप्ताहिक एक्स्प्रेस २१ डिसेंबर, मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस १५ व २२ डिसेंबरला, १२१०३ पुणे-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस २१ डिसेंबर, १२१०४ लखनऊ-पुणे एक्स्प्रेस २२ डिसेंबर, ११४०७ पुणे-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस २१ डिसेंबर, ११४०८ लखनऊ-पुणे एक्स्प्रेस १६ व २३ डिसेंबर, २२१२१ लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस १८ डिसेंबर, २२१२२ लखनऊ-एलटीटी एक्स्प्रेस १९ डिसेंबर, ०९४६५ अहमदाबाद-दरभंगा साप्ताहिक एक्सप्रेस १७ डिसेंबर, तर २२१२२ दरभंगा-अहमदाबाद एक्स्प्रेस २० डिसेंबर रोजी रद्द केली आहे. या गाड्या संबंधित दिवशी प्रस्थान स्थानकापासूनच सुटणार नाहीत.
या गाड्यांच्या मार्गात झाला आहे बदल
१२१४४/१२१४३ सुलतानपूर-एलटीटी-सुलतानपूर ही १४ व २१ डिसेंबर रोजी सुलतानपूर वरून सुटणारी गाडी झाशी, ग्वाल्हेर, भिंड, ईटावा, कानपूर मार्गे वळवली आहे. १५०६६ पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस ही गाडी ११ व १३ आणि १५ तसेच १७, १८ व २० व २१ डिसेंबर रोजी पनवेलवरुन सुटणारी गाडी झाशी, ग्वाल्हेर, भिंड, ईटावा-कानपूरमार्गे वळवली आहे.