मुंबई,- आरोग्य विभागाच्या परीक्षा वादात सापडल्या नंतर म्हाडा भरतीसाठी काही लोक उमेदवारांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येत असून उमेदवारांनी कोणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले होते मात्र अचानक रात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करत परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर केले.
आजची होणारी परीक्षा काही अपरिहार्य, तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्या असून परीक्षा जानेवारी महिन्यात घेतल्या जातील असं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सांगण्यत आलं आहे.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदांसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.