जळगाव, (प्रतिनिधी)- पारोळा येथील एका कृषी केंद्रातून अनधिकृत पणे सूर्यफूल बियाणे विक्री होतं असल्याची माहिती मिळताच कृषिविभागाचे गुणनियंत्रक अधिकारी अरुण तायडे यांनी जिल्हाकृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कृषीकेंद्र विरुद्ध कारवाई करत पारोळा पोलिसात आज ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की, आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता अज्ञात फोन द्वारे गुंनियंत्रक अधिकारी अरुण तायडे यांना माहिती मिळाली की,जय सेवालाल ऍग्रो कजगाव नाका,पारोळा येथे अनधिकृतपणे सूर्यफूल बियाण्याची 2800 रुपये प्रमाणे विक्री करीत असून सदर बियाणेला महाराष्ट्र शासनाचा विक्री परवाना नसतानाही विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाली सदर माहित अरुण तायडे यांनी जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना दिली.
जिल्हाकृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाचे गुंनियंत्रक अधिकारी व मोहीम अधिकारी प्रकाश महाजन यांनी कारवाईसाठी पारोळा गाठून पंचायत समिती कृषीअधिकारी देवेंद्र ठाकूर व कृषी सहाय्यक मनोहर पितृभक्त यांच्याशी संपर्क करून तालुका कृषी कार्यालयात सापळा विषयी चर्चा करून डमी गिऱ्हाईक म्हणून शेख मुनीर अहमद शब्बीर अहमद यांना पाठवले असता पारोळा कजगाव नाक्यावरील जय सेवालाल ऍग्रो दुकान मालक रितेश कैलास बारी यांनी तीन हजार रुपये घेऊन एक सूर्यफूल बियाणे पिशवी दिले. त्याचे बील देखील दिले नाही.
सूर्यफूल बियाणे पिशवीवर ऍग्रो बी सन फॉर्म प्लस हायब्रीड सनफलावर सी असा उल्लेख असलेली 2 किलो बियाणे पिशवी यावेळी या डमी गिऱ्हाईकला देण्यात आली. दुकानदाराने डमी गिऱ्हाईकास बियाणे मिळताच कृषी विभागाच्या पथकाने दुकानाची झाडाझडती घेतली असता महाराष्ट्र शासनाची मान्यता नसलेले ऍग्रो बी सन फॉर्म प्लस हायब्रीड सनफलावर सी असा उल्लेख असलेली 2 किलो सूर्यफूल बियाण्यांची 17 बॅग आढळून आल्याने संबंधित दुकान मालकाविरुद्ध पारोळा पोलिसात गुणनियंत्रक अधिकारी अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.