स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) कडून आपल्या ४४ कोटी खातेधारकांसाठी अलर्ट जारी करून पुढील दोन दिवस बँकेच्या काही सेवा बंद राहतील याबाबत नुकतीच एक महत्त्वाची माहिती ट्विट करून जारी केली आहे.ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार बँकिंगशी संबंधित कामं तातडीनं पूर्ण करावीत, असं आवाहन बॅंकेनं केलं आहे.
‘या’ सेवा असतील बंद….
SBI च्या वतीने देण्यात आलेल्या माहिती नुसार बॅंकेच्या काही महत्त्वाच्या सेवा (SBI Services) आज ११ डिसेंबर २०२१ बंद राहणार आहेत, तसेच एसबीआय इंटरनेट बॅंकिंग सेवा शनिवारी-रविवारी रात्री साडे अकरा ते पहाटे साडे चार वाजेपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध नसेल म्हणजेच बंद असेल.Sbi एसबीआय आता तंत्रज्ञान अपग्रेडेशन करत असल्यानं शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ग्राहकांना ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येणार नाही.
आज ११डिसेंबर २०२१ रोजी रात्री ११:३० ते १२ डिसेंबर २०२१ च्या पहाटे ४:३० वाजेदरम्यान जवळपास तीनशे मिनिटं तंत्रज्ञान अपग्रेडेशनचं काम करण्यात येणारं आहे. एसबीआयच्या ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये INB, Yono, Yono Lite, Yono Business आणि UPI चा समावेश आहे. या सुविधा या कालावधीत बंद राहतील.
भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून sbi `एसबीआय`चं मोठं जाळं पसरलं आहे. बँकेचे ४४ कोटी ग्राहक आहेत.या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना बॅंकिंगशी संबंधित विविध सेवा पुरवल्या जातात. नेहमीच नावीन्य पुर्ण बदल करू sbi आपल्या खातेदार ग्राहकांना व्यवहारात सुलभता येईल याकरिता नवं नवीन अपडेट आणत असते.या बॅंकेच्या ऑनलाइन सुविधांचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience. pic.twitter.com/LZsuqO2B0D
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 10, 2021