आता दूरसंचार विभागाने नवा नियम अमलात आणला असून या नियमानुसार भारतातील लाखो सिमकार्ड बंद पडणार आहेत.
आर्थिक गुन्हेगारी आणि अनावश्यक कॉलबद्दल नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी असतात, नागरिकांनी वेळोवेळी दूरसंचार विभागाकडे देखील याबाबत तक्रारी करीत असतात.सुरु असलेल्या या गैरप्रकाराबाबत लोकप्रतिनिधींनीही दूरसंचार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
अखेर दुरसंचार विभागाने नवा नियम आमलात आणून खऱ्या अर्थाने यावर परिणामकारक उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
आता यापुढे भारतामध्ये ज्या व्यक्तीकडे ९ पेक्षा अधिक ‘सिमकार्ड ‘ आहेत त्या सिमकार्डची फेरतपासनी करण्याच्या सूचना दूरसंचार विभागाने जारी केल्या आहेत.जम्मू -काश्मीर, उत्तर- पूर्व राज्य आणि आसामसाठी सिम कार्डची मर्यादा ६ इतकी ठेवण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने ७ डिसेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार ग्राहकांना पाहिजे ती कनेक्शन चालू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर उरलेली अतिरिक्त सिमकार्ड रद्द करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जर भारतातील एखाद्या व्यक्तीकडे ९ पेक्षा जास्त सिमकार्ड असतील आणि काश्मीर, उत्तर- पूर्व आणि आसामातील व्यक्तीकडे ६ पेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर त्या सर्व सिमकार्डची फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.
ज्या मोबाईल वापरकर्त्या कडे सिमकार्ड अतिरिक्त आहेत पण ते सिमकार्ड वापरात नाहीत ती सिम कार्ड रद्द करून ती डाटाबेस मधून डिलीट करण्याच्या सूचनाही मोबाईल सेवा पुरवठादारांना देण्यात आल्या आहेत. जी सिम कार्ड अतिरिक्त ठरविण्यात आली आहेत त्यांचे कनेक्शन तीस दिवसांत रद्द केले जाईल.