बँक ऑफ बडोदाने रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी असून अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी BOB च्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे अर्ज करू शकतात. एकूण ३७६ रिक्त पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
उमेदवार https://smepaisa.bankofbaroda.co.in/bobSRM/ या थेट लिंकद्वारे या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात.
रिक्त पदांची संख्या
वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर – ३२६ पदे
ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – ५० पदे
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी (बँक ऑफ बडोदा रिक्रूटमेंट 2021) अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
वय मर्यादा :
वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २४ ते ३५ वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 35 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांचे वय 1 नोव्हेंबर 2021 पासून मोजले जाईल. उच्च वयोमर्यादेत OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे.
निवड प्रक्रिया
मुलाखत, गटचर्चा आणि इतर प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
या तारखा लक्षात ठेवा
अर्ज सुरू करण्याची तारीख – १९ नोव्हेंबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०२१
नोटिफिकेशन पाहण्यासाठी : येथे क्लीक करा