नाशिक : नीडल फ्री अर्थात सुईशिवाय देण्यात येणार्या लसबाबत नाशिकसह जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली असून दोन्ही जिल्ह्यांना सुमारे आठ लाख डोस मिळणार आहे. ‘झायको व्ही-डी’ या लसीचे नीडल फ्री डोस देण्यात येणार असून झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
ही जगातील पहिली डीएनए-आधारीत लस आहे. ही लस तीन डोसची लस आहे, दिवस 0, दिवस 28 आणि दिवस 56 अशाप्रकारे ती दिली जाते. काही दिवसांपूर्वी भारताच्या औषध नियंत्रकाने झायडस कॅडिलाच्या स्वदेशी विकसित नीडल-फ्री कोविड-19 लस आहे. आपत्कालीन वापरामध्ये 12 ते 18 वयोगटातील लोकांना देण्यास मान्यता मिळाली आहे.
ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येईल आणि त्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसेल. यामुळेच या लसीचे डोस सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 69 टक्के लोकांना कोविड-19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि 25 टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.