ओमायक्रॉन व्हेरियंटच्या दहशतीने अनेक देशांचे धाबे दानाणले असून
अनेक देशांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अखेर (who)जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने मोठा खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. नेमका हा नवा व्हेरियंट कसा आहे याबाबत स्पष्ट झाले नसल्याने सर्वत्र चिंतेत होते मात्र याबाबत who ने नागरिकांचं मोठं टेन्शन कमी केलं आहे.नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नसून हा अति सौम्य स्वरुपाचा व्हेरियंट असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी देखील नवीन व्हेरियंट बाबत माहिती देतांना सांगितलं आहे की, नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणे डेल्टा व्हेरियंट सारखी धोकादायक नसल्याने ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अद्याप मृत्यू अथवा कोणीही गंभीर झाल्याचे झालेले नाही. यावरुन नवा व्हेरियंटची समस्या गंभीर स्वरुपाची नसल्याचे समजते.
(Who) जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधील वरिष्ठ अधिकारी डॉ कॅथरीन स्मॉलवूड यांनी म्हटलं आहे की,अशा प्रकारच्या उपायांबद्दल आम्ही नव्या व्हेरियंट मुळे विमान सेवा बंद करण्याच्या शिफारसी केलेल्या नाहीत. आफ्रिकेतील प्रादेशिक संचालक डॉ. मॅत्शिदिसो मोटी यांनी देशांनी विमान प्रवासांवर निर्बंध घालू नयेत अशी विनंती केली असून मर्यादांमुळे नवा व्हेरियंट फैलावण्यास मदत होऊ शकते तसेच याचा अर्थव्यवस्था आणि लोकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊ शकतो असं म्हटलं आहे.