एरोंडल,(प्रतिनिधी)- तालुक्यातील कै. यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित अनाथ मुला/मुलीचे बालगृह खडके बु.ता एरंडोल येथे आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगी साहित्य पॅड, पेन्सिल,रबर,कलर,वहि आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.तर यावेळी विद्यार्थ्यांना ‘केक’ वाटप करण्यात आला.
आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन गोर गरीब रुग्णांसाठी झटणारी संस्था – प्रविणसिंग पाटील
आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनने कोरोना काळात गरजू लोकांना अन्नदान,मोफत उपचार करण्यात आले.कोकण विभागात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्यात सामाजिक भान ठेवून खेड्या पाड्यात संसारपयोगी वस्तू,किराणा,कपडे वाटप करण्यात आले.नेहमीच सामाजिक कार्य करत असताना फाउंडेशन व डॉ. जितेंद्र पाटील अग्रेसर असतात. या फाउंडेशनचे काम कौतुकास्पद असून जनसामान्यांच्या हिताचे आहे.आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन गोर गरीब रुग्णांसाठी झटणारी संस्था असल्याची भावना श्री राजपूत करणीसेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणसिंग पाटीलयांनी व्यक्त केली.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटापा प्रसंगी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र पाटील,श्री राजपूत करणीसेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, संतोष बारी,
कार्यध्यक्ष अभिजित पाटील,मुक्ताईनगर अध्यक्ष विलाससिंग पाटील,जामनेर अध्यक्ष सचिन जाधव,पाचोरा अध्यक्ष सुशांतसिंग राजपूत,रोशनसिंह राजपुत, पंकज राजपूत यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना मान्यवर