सीमा सुरक्षा बल BSF ने कॉन्स्टेबल सह इतर ग्रुप C ASI, HC सुतार आणि या पदांसाठी भरती जाहीर केली असून पात्र उमेदवा्रांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७२ पदांवर भरती करण्यात येणार असून सीमा सुरक्षा बल विभागाने भरती बाबत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक २९ डिसेंबर २०२१ आहे.
पदाचे नाव व जागा :
१) ASI – १ पद
२) HC- ६ पदे
३) कॉन्स्टेबल- ६५ पदे
४) एकूण रिक्त जागा- ७२ पदे
शैक्षणिक पात्रता : अधिकृत अधिसूचनेनुसार, ASI पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅट्रिकची पदवी असणे आवश्यक आहे.उमेदवाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये डिप्लोमा देखील केलेला असावा. दुसरीकडे, एचसी आणि कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्रासह मॅट्रिक पदवी असणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा :
अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांचे वय ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
ज्या उमेदवारांना BSF च्या या रिक्त पदासाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत भर्ती पोर्टल rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. त्याच वेळी, त्यांना वैध ओळखपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – नोव्हेंबर १५,२०२१
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर २०२१
पर्यंत आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज ‘फी’म्हणून १0० रुपये भरावे लागतील.
इतका मिळेल पगार…
ASI – पे मॅट्रिक्स लेव्हल-5 (२९,२००-९२,३००) ७ व्या CPC नुसार
SC – पे मॅट्रिक्स लेव्हल-4 (२९,५००-८१,१००) 7 व्या CPC नुसार
कॉन्स्टेबल स्तर-२१,७००-६९,१०0 रु.
अधिकृत संकेतस्थळ : bsf.gov.in यावर भेट देऊन अधिक तपशील जाणून घेऊ शकता.