चक्क पोटच्या मुलीवरच बापानं अत्याचार करत गर्भवती केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून समोर आली आहे.या धक्कादायक प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपीला दोन मुली असून त्यात मोठ्या मुलीचे वय १३ वर्ष आहे, तर दुसऱ्या लहान मुलीचे वय ६ वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नी यांचं पटत नसल्याने अनेक दिवसांपासून विभक्त राहत होते. आरोपी जानेवारी महिन्यांपासून मेंगाळपाडा या ठिकाणी तर त्याची पत्नी भगतपाडा या ठिकाणी राहत होती. यामुळे मोठी मुलगी पित्याबरोबर राहत होती तर लहान मुलगी आईबरोबर राहत होती.
या दरम्यान आरोपी वडील मागील ७ महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं समोर आलं असून धक्कादायक म्हणजे या अत्याचारामधून पिडीत मुलगी गर्भवती देखील राहिली होती. काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला असता आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट देखील लावले होते.त्यामुळे हे प्रकरण दबून राहिले होते.
आरोपीने पुरावे नष्ट करून देखील पिडीतेच्या आईला या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली त्यानंतर पिडीतेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन झालेल्या प्रकारविषयी तेव्हा मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत झालेल्या सर्व प्रकार सांगितला आहे. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. .