जळगाव,(प्रतिनिधी)- येथे संविधान जागर समितीच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशन येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून भव्य संविधान रॅली निघणार असून यासाठी संविधान जागर समितीचे नियोजन पूर्ण झाले आहे.
संविधान रॅली मध्ये सहभागी होण्याचा निर्धार शेकडो नागरीकांनी केला आहे ही रॅली यशस्वी करण्याचे अवाहन मुकूंद सपकाळे रमेश सोनवणे दिलिप सपकाळे वाल्मिक सपकाळे, हरिश्चंद्र सोनवणे,चंदन बिऱ्हाडे, महेंद्र केदारे आदि पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे.