नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. जळगावात पेट्रोल ११७ रुपयांवर १११ रुपयांवर आलं आहे. डिझेल देखील कमी झाले असून ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.
दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेपासून इंधनाचे दर जवळपास स्थिर आहेत.
देशभरातील मोठ्या शहरातील इंधनाचे दर
>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर
>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.