आता ही बातमी तळीरामांसाठी खुशखबर ठरणार आहे, कारण महाराष्ट्र राज्यात आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात थेट ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात यापुढे दारू स्वस्त होणार आहे.याबाबत सरकारनं अधिसूचना देखील जारी केली आहे, या निर्णयामुळे दारू विक्रीत वाढ तर होईलच त्याच बरोबर बनावट दारू विक्रीला मोठ्याप्रमाणात आळा बसेल.
तराज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दारूची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झाली आहे “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक जवळपास शंभर कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल अडीचशे कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून अडीच लाख बाटल्यांची विक्री वाढेल असे अधिकाऱ्याने सांगितले.