तुम्ही ‘गूगल पे’ Google Pay च्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीचं आहे, कारण ‘गूगल पे’ ने आपल्या युजर्स करिता एक सोपं फीचर आणलं असून या फिचर च्या माध्यमातून ‘गूगल पे’ चे युजर्स सोप्या पद्धतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर चे व्यवहार बोलून करू शकणार आहे.ही सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.
डिजिटल ‘पे’ क्षेत्रात फोन पे (PhonePe),पेटीएम (Paytm) आणि अमेझॉन पे (Amazon Pay) शी स्पर्धा करणारे गूगल पे Google Pay सांगते की या श्रेणीतील आणि जागतिक लेबलवर हे Google चे नवीन फीचर्स आहे. यासोबतच अप्लिकेशनमध्ये पसंतीची भाषा म्हणून ‘ईग्लिश’ हा पर्यायही असणार आहे.
गूगल पे च्या नवीन अपडेटनंतर जेव्हा एखाद्या वापरकर्त्याला दुसर्या वापरकर्त्याचा खाते क्रमांक टाइप करावा लागेल तेव्हा स्पीच-टू-टेक्स्ट फीचरच्या मदतीने हे काम बोलूनही करता येईल.बोलून खाते क्रमांक टाइप केल्यानंतर वापरकर्ता त्या खाते क्रमांकाची पुष्टी करेल आणि कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची प्रक्रिया वापरकर्त्याकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील व्यवहाराची कार्यवाही होईल.या भन्नाट फिचरमुळे गूगल पे वापरकर्त्यांना व्यवहार करणं सोपं जाणार आहे.