दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून सुधारित कृषी कायद्याविरोधात देशभरात विरोध सुरु होता, सुधारित कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं,अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ तीनही सुधारित कृषी कायदे मागे घेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित कृषी कायदे मागे घेण्यात येणारं असल्याची घोषणा केली असली तरी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहेत. गुरूनानक जयंतीनिमित्त देशाला संबोधित करत असताना त्यांनी ही घोषणा केली.