जळगाव,(प्रतिनिधी)चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रसार करणार्यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) ने छापेमारी केली असून यात धक्कादायक म्हणजे जळगावातही छापे मारण्यात आले आहेत.यामुळे या भयंकर प्रकारात जळगावपर्यंत कनेक्शन असल्याचे स्पष्ट होत आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफीच्या विरूध्द केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) ने मंगळवारी दिवसभरात देशभरात छापे टाकले. ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी कारवाईमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने जवळपास रो ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. दरम्यान दि.१६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.
या प्रकरणी आता जळगावातून कुणावर नेमकी कारवाई करण्यात आली याची माहिती सीबीआयकडून दिलेली नसली तरी याबाबत लवकरच समोर येऊ शकते.