जळगाव, दि. 15 (प्रतिनिधी) :- जळगाव कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारक तसेच इतर राज्याचे महाराष्ट्र शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी दरवर्षी 1 नोव्हेंबर, 2021 पासून हयातीचा दाखला कोषागारात सादर करणे आवश्यक आहे.
हयातीचा दाखला आपण ज्या बॅंकेमार्फत निवृत्तीवेतन घेत असाल त्या बँकेमध्ये कोषागाराने पाठविलेल्या हयातीच्या यादीमध्ये आपल्या नावासमोर दिनांकीत करणे आवश्यक आहे.याबाबत राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सि. पंडित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
00000