‘कायदा आंधळा आहे, आज जर हे न्यायालय ‘मुके’ झाले तर मुश्किल होईल….हा संवाद आहे नुकताच रिलीज झालेल्या ‘जयभिम’ चित्रपटातील, साऊथचा सुपरस्टार अभिनेता सुर्या सिवकुमार कोर्टरूम मधील एका पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी युक्तिवाद करतांना दिसत आहे. ‘कायदा आंधळा आहे, आज जर हे न्यायालय ‘मुके’ झाले तर मुश्किल होईल…. या डायलॉग ने चित्रपट खास झालेला दिसून येतो.
तामिळनाडूमधील (Tamilnadu) सत्य घटनेवर आधारित चित्रपट ‘जयभिम’ चित्रपटात साऊथचा सुपरस्टार सुर्या सिवकुमारने मुख्य भुमिका केली असून हा चित्रपट तमिल, तेलुगु, हिंदी, कन्नड़ आणि मलयालम या पाच भाषांमध्ये प्रदर्शीत करण्यात आला आहे.
या चित्रपटातून तमिळनाडूमध्ये ९० च्या दशकात झालेल्या आदिवासी बांधवांवरील अत्याचारा बाबत एक वकील न्याय मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायाची लढाई लढतांना दिसतो.
‘जयभिम’ चित्रपटाचं दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल यांनी केलं असून सूर्यासह, प्रकाश राज, राव रमेश, रजीशा विजयन, मणिकंदन आणि लीजोमोल जोस या कलाकारांनी प्रेक्षकांना आवडेल अशी भूमिका केली आहे.
‘जयभिम’ नावाने चित्रपट चर्चेत…
‘जयभिम’ चित्रपट नावानेच चर्चेत आला असून हा चित्रपट पूर्णपणे अन्याया विरुद्ध लढण्याची, आत्मसन्मानाची, हक्कासाठी लढण्याची प्रेरणा देणारा चित्रपट आहे. संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला आहे, जात पातीचे साखळदंड तोडले असतांना ९० च्या दशकात आदीवासी समुदयावर होणारे अत्याचार या चित्रपटातून दाखविण्यात आलेल्या दृष्यातून राग ही येतो, तर यात साऊथचा सुपरस्टार सुर्या सिवकुमारने मुख्य भुमिकेला न्याय देत त्या आदिवासी पीडित महिलेला न्याय मिळवून दिल्याने कायद्याचा विजय झाल्याचे पाहायला मिळाले आहे
तामिळनाडूमध्ये १९९५ साली घडलेल्या एका सत्य घटनेवर ही फिल्म आधारित आहे, यात एका आदिवासी कुटुंबातील व्यक्तींचा पोलिसांनी केलेला छळ, आदिवासी कुटुंबातील लोकांवर दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे, पोलीस कस्टडीत मारहाणीत एका निर्दोष आदिवासीचा मृत्यू आणि या अन्याया विरुद्ध न्याय मागण्यासाठी ठामपणे उभी असलेली एक गरोदर आदिवासी महिला,त्यांना न्याय देण्यासाठी सुर्याची लढाई असा स्वरुपाचा हा चित्रपट खरोखर पाहण्या सारखा आहे.