जळगाव, (प्रतिनिधी)- दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नावरे यांना आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार देऊन उद्या दिनांक 14 रोजी 2021 रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय 16 वे आंबेडकरी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्राचार्य भगवान नन्नावरे यांना क्रांतिबा ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.दरम्यान जालना येथील राजकुमार तांगडे यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार तर संबोधी देशपांडे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर शिखरे, एरोंडल प्रांतधिकारी विनय गोसावी, उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान हास्यजत्रा या विनोदी मालिकेतील प्रा. हेमंत पाटील यांचा प्रतिष्ठान तर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शरद भालेराव, विलास यशवंते, हरिश्चंद्र सोनवणे, दीपक जोशी, कुलदीप भालेराव यांनी केले आहे.