मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेची अध्यक्ष म्हणून काम करतांना कर्जमाफी योजनेमध्ये राज्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर कौतुक केले होते याची आठवण रोहिणी खडसे यांनी महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी प्रास्ताविक करतांना करून दिली.
प्रास्तविक करताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेल्या सहा वर्षांपासून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने जिल्हा बँकेची अध्यक्ष म्हणून काम केले या कार्यकाळात आदरातिथ्य व इतर अतिरिक्त खर्चाला कात्री लावून सर्व कारभार पारदर्शक पद्धतीने केला. बँकेचे शंभर टक्के संगणिककरण डिजिटलायझेशन केले त्यामुळे बँकेचा कारभार जलद गतीने झाला बँकेच्या ठेवी मध्ये वाढ झाली बँकेला क दर्जातून अ दर्जात आणता आले, बँकेने शंभर वर्षाच्या इतिहासात प्रथमच स्व भांडवलातून पतपुरवठा केला, नुकताच बँकेचा बेस्ट डिजिटल बँक म्हणून गौरव करण्यात आला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने हे कार्य असेच सुरू राहील त्यासाठी आपण सर्व मतदारांनी सहकार पॅनल च्या उमेदवारांना विजयी करावे असे त्यांनी आवाहन यावेळी केले.
जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मुक्ताई मंदिर येथे आदिशक्ती मुक्ताईचे विधिवत पुजन करून आणि नारळ वाढून करण्यात आला. त्यानंतर खडसे फार्म येथे मतदारांचा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला.यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर,सतिष अण्णा पाटील, जळगाव महापौर जयश्रीताई महाजन,माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील, संजय पवार, नाना राजमल पाटील,संजय गरुड, रोहिणी खडसे खेवलकर, शिलाताई निकम, मेहताबसिंग नाईक, श्यामकांत सोनवणे,विनोद तराळ, रवींद्र नाना पाटील, वंदना ताई पाटील, एजाज भाई मलिक,मंगला ताई पाटील,कल्पिताताई पाटील, सरिता ताई माळी,वाल्मिक पाटील, रमेश नागराज पाटील, डी के पाटील,सोपान पाटील,ईश्वर रहाणे यु डी पाटील, निवृत्ती पाटील,सुधाकर पाटील,दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजू माळी, शिवराज पाटील,अरविंद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. गेल्या पाच वर्षात बँकेच्या संचालक मंडळाने काटकसरीनचे धोरण अवलंबुन उत्कृष्ट पारदर्शक पणे कार्य केले आहे कुठलाही गैरव्यवहार झाला नसून विरोधक अपप्रचार करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जिल्ह्यातील शेतकरी मतदार राजा सुज्ञ आहे गेल्या पाच वर्षात झालेलं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे गेल्या पंचवार्षिक मध्ये शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली संचालक मंडळाच्या विश्वासावर आणि पारदर्शक कारभारामुळे बँकेच्या ठेवीत मोठी वाढ झाली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच कायम ठेवून परत एकदा सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी माजी मंत्री सतिष अण्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सहकार पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे म्हणाले जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकाराचा समृद्ध वारसा असलेली आशिया खंडातील अग्रणी बँक आहे स्व प्रल्हादभाऊ पाटील ,जे एस अप्पा,ओंकार अप्पा वाघ यांच्या सारखे अध्यक्ष राहिलेली हि बँक आहे त्यांनी जिवापाड मेहनत करून बँकेला वैभव, नावलौकिक प्राप्त करून दिला मध्यंतरी काही चुकीच्या निर्णयामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली होती ती सुस्थितीत आणण्यासाठी मागच्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती केली. त्यांनंतर रोहिणी खडसे या चेअरमन झाल्या सर्व संचालक मंडळाने पारदर्शक पद्धतीने काटकसरीने कारभार केला. त्यातुन बँकेला असलेला संचित तोटा ६०० कोटी पर्यंत भरून काढण्यात संचालक मंडळाला यश आले. आज विरोधक खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप करत आहेत परंतु रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार तारण ठेवून सर्व कर्ज दिलेले आहेत. त्याची कर्जफेड नियमित आहे त्यातून बँकेला मोठया प्रमाणावर व्याज मिळत आहे हे सर्व नियमानुसार झालेले आहे विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करा. यापुढे सुद्धा येणारे संचालक मंडळ पारदर्शक पद्धतीने कारभार करेल याची मी ग्वाही देतो.
गेल्या संचालक मंडळाने ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक पणे भरती प्रक्रिया राबवली. बँकेचे संगणकीकरण करून कारभार जलद गतीने केला. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार केले. त्यामुळे बँक एन पी ए मधून बाहेर आली बँकेचा मोठया प्रमाणात संचित तोटा भरून निघाला बँक क वर्गातून अ वर्गात आली. हे सर्व शेतकरी बांधवांच्या सभासदांच्या मतदारांच्या सहकार्याने,विश्वासाने आणि आशीर्वादाने शक्य झाले. बँकेची ही घोडदौड अशीच कायम राखण्यासाठी सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे त्यांनी आवाहन केले. यावेळी तालुक्यातील मतदार आणि महाविकास आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे अरविंद गोसावी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले