मुंबई । इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळण्याआधी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्कात कपात केली. त्यानंतर जवळ्पास २३ राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. परिणामी बहुतांश शहरांमध्ये इंधन दर कमी झाले आहेत. दरम्यान, सलग सातव्या दिवशी देशातील इंधन दर स्थिर आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाहीय.
त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. जळगावात आज पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे. तर आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे.
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे.