पाचोरा – शहरातील समस्त दिव्यांग सेना बांधवानी दि. 1जून रोजी सकाळी १०:०० वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांना आपल्या अडी अडीचणी – समस्या निवारण करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले. आ. किशोर आप्पा पाटील यांनी दिव्यांग बांधवाच्या समस्या – अडचणी समजून घेतल्यात. गांभीर्याने दखल घेऊन. पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग सेना बांधवासाठी ५% राखीव निधी ठेवण्याबाबत दि. ०६.०९.२०१९ रोजी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे अभिवचन दिले. तसेच भविष्यात देखील आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे. आपणास मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. असे देखील बैठकीत नमूद केले.
उपस्थित सर्व दिव्यांग बांधवानी आनंद व्यक्त केला. आमदार महोदयांचे आभार मानले. भविष्यातील यशोकामना व्यक्त केल्या. यावेळी गणेश पाटील, शरद पाटे, किशोर बारवकर, भर खंडेलवाल, पप्पू दादा राजपुत, राजेश पाटील व दिव्यांग सेनेचे कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.