जळगाव – विजय भास्कर पाटील व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने माविप्र दोन गटातील हाणामारीच्या कलम 307 च्या गुन्ह्यात दोन दिवसांपूर्वीच
जामीन मंजूर केला केला आहे मात्र गेल्या दोन दिवसा पासून त्यांची सुटका तर झालीच नाही परंतु अजून त्यांचा कारागृहात मुक्काम वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता पाटील गटाने निलेश भोईटे यात तांत्रिक अडचणी तसेच दबाव आणत असल्याने जामीन होऊनही जामीन घेण्याच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचा आरोप केला आहे.मात्र विजय पाटील यांचा जामीन तांत्रिक अडचणी मुळे घेतल्या गेला नसल्याचे समजते.
विजय पाटील यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या समर्थनार्थ कोणीही उभे नाहीत आणि जे आहेत ती मंडळी अकार्यक्षम असल्याचे पाटील गट आमच्यावर खोटे आरोप करीत आहे.आम्ही मे.न्यायालयाचा आदर करतो. न्यायालयीन प्रकरणात माझा हस्तक्षेप नाही .
– निलेश भोईटे
मानद सचिव, मविप्र