कासोदा,(राहुल शिंपी)- कासोदा येथुन जवळचं आसलेल्या उमरे येथील अविनाश समाधान पाटील याचे फौजी प्रशिक्षण पुर्ण झाल्यानिमित्ताने बुधवार सकाळीं ८ते १० यावेळी गावात मिरवणूक काढण्यात येणार असुन नंतर सत्कार समारंभ सप्तशृंगीमाता मंदीर उमरे येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी आ.सतिश पाटील, आ.चिमणराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार पारोळा, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, हिंमत भिला पाटील , मछिन्द्र पाटील, ज्ञानेश्वर आमले, महानंदा पाटील, प्रांत विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण,पो.नी. ज्ञानेश्वर जाधव एरंडोल, सपोनी निता कायटे कासोदा, पीएसआय नरेश ठाकरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
अविनाश पाटील हा एका लहानशा खेड्यात राहणारा असुन तो नारायण भास्कर पाटील यांचा नातू असुन कै. समाधान पाटील यांचा मुलगा आहे.