पाचोरा- सोयगांव तालुक्यातील अजिंठा डोंगरमाळा परीसरात दि.१९ रोजी दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाल्याने बहूळा नदिला अचानक पूर आल्याने चिंचपूरा तालुका पाचोरा येथील दोन इसम नदिपात्रातून जात असतांना अचानक पाणी वाढले व त्यात दोन इसम पाय घसरुन १५ ते २० फुट वाहत जात असतांना गावातील काही पोहणाऱ्या युवकांनी त्यांना बाहेर काढले. या मुळे जिवीत हानी टळली. गेल्या दहा वर्षांपूर्वी याच पुलावरून दोन महीला वाहून गेल्याची घटना घडली होती. यामुळे या पूलाची उंची वाढविण्याची अनेक वर्षा पासून मागणी असतांना हा प्रश्न प्रलंबीतच असल्याने परीसरातील नागरीकांमधे नाराजीचा सूर उमटत आहे.
पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आठवडा भरापासून पावसाने चांगलाच कहर केला आहे. मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगरमाळा परीसरात पाचोरा तालुक्याचा वरील भाग असल्याने गेल्या चार दिवसांपासून वरील भागातील संपूर्ण प्रकल्प भरल्याने डोंगरी भागात जरा हि पाऊस झाला तरी पाचोरा तालुक्यातील नद्यांना अचानक पूर येवू लागला आहे, दिनांक १९ रोजी सकाळी नऊ वाजता बहुळा नदिला अचानक पूर आला चिंचपूरा येथील संभाजी शिवराम पाटील वय ५२ व जानुद्दीन रमजान तडवी वय ६० हे दोघे जण जवळच असलेल्या भोजे गावात भाजीपाला घेण्यासाठी गेले होते भाजीपाला घेऊन घरी जात असतांना चिंचपूरा ते भोजे गावा जवळून जाणाऱ्या हिवरा नदिला काही प्रमाणात पूर आला होता. मात्र संभाजी पाटील व जानुद्दिन तडवी नदिपात्रातून जात असतांना अचानक पाणी वाढले व दोघे इसम एकमेकाचा हात धरून जात असतांना एकाचा पाय घसरल्याने दोन्हीही वाहू लागले, दरम्यान पुर पाहण्यासाठी गावातील अनेक मंडळी जवळच असल्याने त्यातील करण तडवी, विनोद तडवी, शब्बीर तडवी, शेखर तडवी, जाकिर तडवी या युवकांनी पाण्यात उड्या घेऊन दोघांना सुखरुप बाहेर काढले व अनर्थ टळला, नदिवरील पूलाची उंची वाढविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.