विरार,(प्रतिनिधी)- महिना भरापूर्वीच लग्न झालेल्या २८ वर्षीय नवविवाहितेचा निवस्त्र मृतदेह सापडला असून या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विरार मधील कारगिल नगर, जय तुळजा भवानी संकुल बिल्डिंग नंबर ६ मध्ये राहणाऱ्या प्रिया कांबळे वय – २८ वर्ष असलेल्या या महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हाताची नस कापलेल्या अवस्थेत आढळली असून रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मृत महिलेचा पती शुक्रवारी रात्रपाळीला कामावर गेला होता. शनिवारी सकाळी कामावरून घरी आल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, पोलीस अधिक तपास करीत आहे.