jपाचोरा :- अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता स्त्रीत असल्यामुळे महिलांना समाजात आदराचे स्थान मिळवून देण्याची ताकद शिवसेनेत आहे. त्याअनुषंगाने युवानेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत असून शिवसेनेचे कार्यसम्राट आ.किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील महिलांसाठी दिनांक – २१ सप्टेंबर २०१९ शनिवार वेळ – सकाळी ठिक ११ वाजता
ठिकाण- महालपुरे मंगल कार्यालय,पाचोरा स्वतःचा आत्मविश्वास बळकटीसाठी, स्रियांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी यासाठी “प्रथम ती” महिला संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनास डॉ.शुभा राऊळ (मुंबई म.न.पा.चे माजी महापौर), शितल म्हात्रे (मुंबई म.न.पा.नगरसेविका) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी, पाचोरा-भडगाव तालुक्यातील महिलांसाठी शनिवार दि.२१ सप्टेंबर २०१९ रोजी ‘प्रथम ती’ महिला संमेलन महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी पाचोरा-भडगाव तालुक्यातील व शहरातील संघटनेचे सर्व महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, महिला-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे विनम्र आवाहान शिवसेना महिला आघाडी पाचोरा व भडगाव यांच्या तर्फे करण्यात केले आहे.