जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असून खडसेंच्या विरोधात नाम निर्देशन अर्ज भरणारे नाना पाटील यांची याचिका मे.उच्च न्यायालयाने फेटाळली असल्याने खडसेंची जागा निघणार आहे. दरम्यान या बाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
खडसेंच्या विरोधात नाम निर्देशन अर्ज भरणारे नाना पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील जय माता दी पथसंस्थेचे कर्जदार असल्याचे सांगून रद्द केला होता. नाना पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत अपील केले केले होते.मात्र त्याठिकाणी देखील सुनावणी वेळी अपील फेटाळून लावण्यात आले होते.
विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र अखेर न्यायालयाने देखील त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला आहे.जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे विरोधक असलेले नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे बिनविरोध निवडून येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.