जळगाव,(प्रतिनिधी)- आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिति महाराष्ट्र राज्यच्या वतीने माजी कॅबिनेट मंत्री भांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातील अन्यायग्रस्त एक कोटी आदिवासींच्या प्रतिनिधींचे अधिवेशन संतभुमी शेगाव येथे आयोजन दि.7 नोव्हेंबर 2021रोजी सकाळी 9 ते 5 दरम्यान करण्यात आले आहे.
या अधिवेशनाला कोळी समाजातील विविध संघटना पदाधिकारी , सर्व समाज कार्यकर्ते व विविध लोकप्रतिनिधी, अभ्यासक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या अधिवेशनाला राज्यातील, जिल्ह्यातील, आदिवासी कोळी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कोळी समाज समाजाच्या या संघर्ष चळवळीचा भाग व्हावा असे आवाहन रावेर तालुका आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समितिच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.