मुंबई : मनी लॉन्ड्रिंगप्रकणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज कोर्टाने जामीन नाकारत ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. हा अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे मानला जात आहे.
अनिल देशमुख काल स्वत:हून ईडीकडे हजर झाले. ते काल वकिलांसोबत हजर झाले. रात्री 12.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी झाली. ईडीने देशमुख यांची दीर्घ चौकशी केल्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांना अटक केली. त्यानंतर आज सकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. देशमुख यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांना जोरदार बाजू मांडली असतानाही अखेर कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला.
दरम्यान, 6 नोव्हेंबरनंतर देशमुखांचे वकील हे देशमुखांच्या आजारपणाचं कारण देऊन त्यांना जामिनावर सोडण्याची विनंती करतील. आताही देशमुखांचे वकील जामिनासाठी अर्ज करतील. पण त्यांना जामीन मिळेलच असे नाही, असं ज्येष्ठ वकील उदय वाळूंजकर यांनी सांगितलं.