नवी दिल्ली: बर्याच वेळा नोकरी किंवा व्यवसाय असलेल्या लोकांना तातडीच्या कामामुळे किंवा बदलीमुळे ठिकाणे बदलावी लागतात. अशा परिस्थितीत वारंवार होम ब्रँचमध्ये जाऊन काम करून घेणे शक्य होत नाही. तुम्हीही काही कारणास्तव इतरत्र राहात असाल आणि तुमच्या बँकेची गृह शाखा बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या बँकेची शाखा सहज बदलू शकता. त्याची स्टेप टू स्टेप प्रक्रिया जाणून घेऊया.
गृह शाखा बदलण्याची प्रक्रिया
बँक शाखा बदलण्याचे नियम प्रत्येक बँकेत वेगळे आहेत. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुमच्या बँक खात्याची होम शाखा बदलू इच्छित असाल तर तुम्ही हे काम घरी बसून करू शकता. यासाठी तुमचे इंटरनेट बँकिंग कार्यरत असणे आवश्यक आहे. जर असे होत नसेल, तर तुम्ही प्रथम इंटरनेट बँकिंगसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
SBI मध्ये बँक शाखा बदलण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम www.onlinesbi.com या वेबसाइटवर जा.
तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असल्यास, पर्सनल बँकिंग पर्यायावर जाऊन लॉग इन करा.
जर तुम्ही आधीच नोंदणी केली नसेल तर आधी तुमचा आयडी रजिस्टर करा.
आता ‘ई-सर्व्हिसेस’ या पर्यायावर क्लिक करा.
पुढे, बचत खात्याच्या हस्तांतरणावर जा.
SBI मध्ये खाते असल्यास, हस्तांतरित करायचे खाते आपोआप निवडले जाईल.
आता तुम्हाला जिथे खाते हस्तांतरित करायचे आहे त्या शाखेचा शाखा कोड टाका.
त्यानंतर गेट ब्रँच नेम पर्याय निवडा आणि नवीन शाखा निवडा.
आता नवीन शाखेचे नाव टाकून ते सबमिट करा.
एकदा सबमिट केल्यानंतर, तुमची बँक शाखा बदलण्याची विनंती देखील नोंदविली जाईल.
हेही वाचा- 7वा वेतन आयोग: कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा खुशखबर! चल महागाई भत्त्यात मोठी वाढ, जाणून घ्या किती वाढणार पगार
PNB मध्ये बँक शाखा बदलण्याची प्रक्रिया
यामध्ये तुम्ही रिटेल इंटरनेट बँकिंगद्वारे लॉगिन करा
यानंतर इतर सेवांच्या पर्यायावर क्लिक करा आणि होम ब्रांच बदला हा पर्याय निवडा
आता खाते ज्या शाखेत हस्तांतरित करायचे आहे तो आयडी निवडा
शाखा आयडी एंटर केल्यानंतर पुढे जा आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका.
संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमची विनंती नोंदवली जाईल.