दहावी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन नेव्ही मॅट्रिक रिक्रूट स्कीम अंतर्गत 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांवर भरतीसाठी भारतीय नौदलाने अर्ज जारी केले असून आजपासून अर्ज भरण्यात येत आहेत. नौदलाने ज्या तीन पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यात कुक, कारभारी आणि सफाई कामगार या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान झाला असावा झालेला असावा.
1500 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा
भारतीय नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या 300 रिक्त पदांची राज्यवार विभागणी करण्यात आली आहे. अर्ज केलेल्या एकूण उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारावर 1500 उमेदवारांची निवड केली जाईल. या 1500 उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक योग्यता चाचणीला सामोरे जावे लागेल. भारतीय नौदलाच्या भर्ती संचालनालयाने स्पष्ट केले आहे की लेखी परीक्षेला बसण्यासाठी पात्रता कट ऑफ गुण वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असणार आहेत.
कामाच्या जबाबदाऱ्या
कुक (शेफ) ला डिशच्या यादीनुसार शाकाहारी आणि मांसाहारी अन्न बनवावे लागेल. याशिवाय रेशनचा हिशेबही ठेवावा लागणार आहे. गरज पडल्यास त्यांना इतर कामेही दिली जाऊ शकतात. अधिकाऱ्याच्या मेसमध्ये वेटरप्रमाणे जेवण देणे, घराची व्यवस्था करणे, निधीचा हिशेब ठेवणे, ताटांची यादी इत्यादी कामे स्टीवार्डला करावी लागतील. सफाई कामगाराने स्वच्छतागृह, स्नानगृह आणि इतर ठिकाणे स्वच्छ करावी लागतील. सेवा आवश्यक असल्यास त्यांना इतर काम देखील दिले जाऊ शकतात.
वेतन :
नोकरीत निवड होण्यापूर्वी भारतीय नौदलाकडून प्रशिक्षण दिले जाईल. दुसरीकडे, पगाराबद्दल बोलायचे झाले तर, दरमहा 14,600 रुपये दिले जातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संरक्षण वेतन मॅट्रिक्समध्ये 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार दिला जाईल.
जाहिरात : PDF