जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व रावेर तालुका तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी व्हि.एस. काॅलेज, बुऱ्हाणनगर रोड, रावेर तालुका रावेर येथे सकाळी 10 वाजता वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेतील प्रथम विजेते आठ पुरुष व महिला यांचा संघ पुढील महिन्यात पालघर येथे होणाऱ्या वरिष्ठ राज्य स्पर्धेत सहभागी होईल. सदर स्पर्धा जागतिक तायक्वांदो संघटनेच्या नियमानुसार होतील जास्तीत जास्त खेळाडूंनी यात स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिवन महाजन ( ७०२०६०३७८३ ) जयेश बाविस्कर (८६००४९०४०३) यांचेशी संपर्क साधावा असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे .