मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर आज २५ दिवसांनी जामीन मिळाला आहे. आर्यन खानसोबतच अरबाज खान आणि मुनमुन धमेचा यांचीही जामिनावर सुटका होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर सुनावणी सुरू होती. या प्रकरणावर आज निर्णय आला असून जामीन निर्णयाची सविस्तर प्रत उद्या येणार आहे.
या दिवशी तुरुंगातून बाहेर येईल
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी म्हणाले, ‘बॉम्बे हायकोर्टाने तीन दिवसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला आहे. उद्या सविस्तर आदेश दिला जाईल. उद्या शुक्रवारी किंवा शनिवारपर्यंत सर्वजण तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. त्यांनतर या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. यामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये होतं पुढं आलं होतं. . आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.
दरम्यान, या प्रकरणात जळगावातील एका हॅकरने मोठा दावा केला होता. त्याच्या या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. या हॅकरचं नाव मनीष भंगाळे असं असून तो जळगावातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने या प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे लिखित तक्रार केली आहे. यात दिल्यानुसार पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी हॅकरला ५ लाखांची ऑफर देण्यात आली होती.