मुंबई : सलग पाच दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी इंधनाचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे जळगावात पेट्रोलचा प्रतिलीटर दर ११४.६२ रुपयावर गेला आहे. तर डिझेलचा दर १०३.८८ रुपयांवर गेला आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही.
पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.46 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.59 आणि 96.32 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.