जळगाव / रावेर,(प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या सर्वपक्षीय पॅनल ठरलं असतांना जिल्हातील ‘झारीच्या शुक्राचार्य’ मुळे आमच्या सोबत दगा फटका झाल्याचं भाजपा नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज रावेरात म्हटलं आहे.
पुढे बोलतांना आ. गिरीश महाजन म्हणाले की जिल्हा बँकेच्या निवडणूक करिता सर्वपक्षीय पॅनल बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बोलूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी आपली भूमिका बदल्यामुळे आमच्या सोबत दगा-फटका केल्याचं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष केलं आहे.
.