मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेली ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने असल्याचा आमदार आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज दि.21 रोजी मुक्ताईनगर येथे केला.
दरम्यान आमदार रोहित पवार पुढे बोलतांना भजपा नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली असून गिरीश महाजनांना पैशांची घमेंड असून ते पैशांच्याच बळावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची टीका सुध्दा त्यांनी केली.