कासोदा ता .एरंडोल – वनकुठे येथील लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील यांचा मौलाना आझाद विचार मंच व प्रकाश दायी वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्कार करण्यात आला.सरपंच उमेश पाटील यांनी दर्गावर लाईट तसेच पायऱ्या बसवले व दर्गाच्या सुशोभीकरण केले या कार्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला.
पाचोरा येथील पोलीस रक्षक चे पत्रकार अमजद खान यांच्या हस्ते तर आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या प्रसंगी नुरुद्दिन मुल्लाजी, अहमद भाई ,मुजफ्फर अली, निसार भाई, हमजे खान, इशताक मुजावर ,जलाल भाई, मुक्तार पटवे, सलाउद्दीन दादा तसेच वनकोठे येथील उपसरपंच गोरख सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.