महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या पदासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येत होता पण आता उमेदवारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. MPSC तर्फे यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
राज्य सेवा परीक्षा २०२१ अंतर्गत २९० रिक्त जागांवर पद भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या पदांसाठी २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे.
एमपीएससीने सोमवारी राज्यसेवा परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी आणि तत्सम पदे, वित्त व लेखा सेवा सहायक संचालक, उद्योग उपसंचालक, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदे, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशी २९० पदे भरण्यात येणार आहे.
एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये सरकारच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गांपैकी काही मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. नी दिली.