जामनेर, प्रतिनिधी| तालुक्यातील गारखेडा या गावापासून काही अंतरावर जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणाच्या बेटच्या परिसरात या पर्यटन स्थळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिन्याभरात पर्यटकांसाठी सुरू होणार आहे. दरम्यान कामाची पाहणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी लवकर काम आटोपून पर्यटन स्थळ सेवेत रुजू करण्याचे सुचना केली.
या ठिकाणी पर्यटकांसाठी बांबू हाऊस उभारण्यात येणार असून पर्यटकांसाठी तीन व चार बेड असलेली हाऊस बोट सुद्धा उपलब्ध राहणार आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी दोन-तीन दिवस राहता येणार आहे. पर्यटकांना पर्यटनस्थळाचा आनंद घेता येणार आहे. पर्यटनस्थळ सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी नसेल असा पर्यटनस्थळ उदयास येणार आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत पर्यटन स्थळ सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिली आहे. यावेळी सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण , सरपंच शालिक पवार, जगदीश पाटील, हुला महाजन, अशोक पाटील आदी उपस्थित होते.