वाळूच्या वाहतुकीतून गांजा , गुटख्याची ५ कोटींची चाळीसगावातून उलाढाल
चाळीसगाव- चाळीसगाव शहरातून ५ कोटींच्या गांजा आणि गुटख्याची विक्री होतं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून वाळू व्यवसायाच्या माध्यमातून चोरट्या रीतीने गुटखा आणि गांजाची विक्री होत असल्याचे आज तहसीलदार कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या ट्रकटरमध्ये गांजाची रोपटे उगविली असल्याने या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे चाळीसगावातून मोठ्या प्रमाणत गुटखा आणि गांजा वितरित होत असून याकडे मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे .
चाळीसगाव शहरात गेल्या 4 वर्षात तीनशे कोटी पेक्षा अधिकचा वाळू उपसा झाला आहे. यात हिंगोने येथील तीतूर नदी आणि गिरणा नदीचा समावेश होता. याविषयी गाजावाजा झाला, 2 कोटी दंडाची कारवाई झाली. काही महसूल अधिकारी याच्यावर गंडांतर तर आले.
या प्रकारानंतर काही कारवाई म्हणून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. हे ट्रॅक्टर मध्ये पाणी मुरू लागलं, सत्य बाहेर पडल वाळूच्या ट्रॅक्टर मधून चक्क गांजाची रोप उगवून बाहेर पडू लागली
महाराष्ट्र पोलिसांना एक मोठं आव्हान समोर येऊन ठेपल आहे. की चाळीसगाव मधून येणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टर मध्ये लपवून गांजाची तस्करी औरंगाबाद, मुंबई पुणे , नासिक , या शहरात होत होती का? याविषयीची तपास सुरू करणे गरजेचे आहे.
वाळू तस्करी मधून कोट्यवधीची कमाई आणि त्या वाळू आड गांजाची तस्करी असे जोड धंदा सुरू असल्याचा हा सबळ पुरावा असल्याचे म्हटले जात आहे. तसेच प्रशासनाने गांजाची रोपे काढण्याअगोदर पंचनामा करणे क्रमप्राप्त असताना तो न करता झाडे उपटून फेकून देण्यात आली असल्याने कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून गांजा आणि गुटखा तस्करांचा त्वरित शोध घेऊन कारवाई मागणी चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केली आहे.