जळगाव- राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा सुनावलेल्या आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामिनावर आता २६ सप्टेंबर रोजी कामकाज होणार आहे. माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह २८ जणांचे अर्ज आज न्यायालयाने दाखल करून घेतले असून पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला दिली आहे.
आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी न्या.टी.व्ही.नलावडे,न्या.के.के.सोनवणे यांच्या द्वीपीठासमोर कामकाज झाले. मात्र सरकारच्या अपिलावर न्यायालयाने त्रुटी काढली. त्यामुळे आज १९ रोजी कामकाज होते. मात्र आजही कामकाज होऊ शकले नसल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे. आता यावर 26 सप्टेंबरला कामकाज होणार आहे. आज गुरुवारी जमीन अर्ज दाखल करून घेण्यात आले आहे.