मुंबई – तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत असं म्हणत केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईवरून भाजपावर सडकून टीका करत आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली.
भाषणाच्या सुरवातीला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की,आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी ..”जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि बघिनी आणि मातांनो” अशी हाक देता आली !
गांधी-सावरकर यांच्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचाही उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला असून सावरकर-गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. यावर सावरकर, गांधी उच्चारण्या इतकी आपली लायकी आहे का? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला.
RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला…
सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे.? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका.पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर हे मेळावेतरी कशाला ?
त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत.मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता अशी आठवनही उद्धव ठाकरे यांनी करून दिली.