राज्यात येत्या ४८पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून IMD ने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र भागातील काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
मान्सूनने यावर्षी महाराष्ट्र राज्यातून एक दिवस आधीच परतीला गेला असून गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील ४८तासांत ओडिशा व अनेक राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
१६ तारखेला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
जळगाव,नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर अशा एकूण दहा जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘येलो’ अलर्ट जारी केला आहे.